नवरात्रोत्सवानिमित्त आमदार प्रमोद जठार कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी सपरिवार नतमस्तक

*कोंकण एक्सप्रेस
*नवरात्रोत्सवानिमित्त आमदार प्रमोद जठार कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी सपरिवार नतमस्तक
*कोल्हापूर : प्रतिनिधी
बळीराजावरील संकटे दूर व्हावीत, शेतकऱ्यांना सुख-समाधानाचे दिवस यावेत आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम समृद्धी नांदावी, आमदार जठार यांचे अंबाबाई चरणी साकडे
कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असताना आमदार प्रमोद जठार यांनी सौ. नीरजा जठार व सहपरिवारासह आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. विशेषतः राज्यातील बळीराजावरील संकटे दूर व्हावीत, शेतकऱ्यांना सुख-समाधानाचे दिवस यावेत आणि महाराष्ट्रात सुजलाम् सुफलाम् समृद्धी नांदावी, अशी मनोकामना त्यांनी आई जगदंबेच्या चरणी व्यक्त केली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत. या पवित्र वातावरणात आमदार जठार यांनी कुटुंबीयांसह देवीचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागितला.
“आई अंबाबाईच्या कृपेने महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. बळीराजावरील सर्व संकटे दूर होऊन राज्यात भरभराट यावी,” अशी भावना यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली.
जाहिरात
