*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर

*कोंकण एक्सप्रेस
*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर
*द स्पाईन फाउंडेशन व कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम;
*ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार मोफत तपासणीचा लाभ
*कणकवली: प्रतिनिधी
नोव्हेंबर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील नागरिकांना मणक्याच्या आजारांबाबत योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने द स्पाईन फाउंडेशन आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालय (SDH) यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले आहे.
मणक्याचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी तसेच मानदुखी यांसारख्या त्रासांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगतळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू
ब्रेकिंगजिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक
ब्रेकिंगपोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर
ब्रेकिंग