रविवार, ८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर• निसर्गाचे रक्षण हीच खरी दिवाळी!• उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’• सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर• निसर्गाचे रक्षण हीच खरी दिवाळी!• उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’• सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त

किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

📅 ८ नोव्हेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग
किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

*कोंकण एक्सप्रेस

*किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

*विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदील व मातीच्या पणत्या

*शिरगाव : संतोष साळसकर

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने जि.प. प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक आकाशकंदील तयार केले. तसेच मातीपासून सुंदर पणत्या बनवून भारतीय संस्कृती व पारंपरिक कलेचा अनुभव घेतला. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतली.

या वेळी विद्यार्थ्यांनी "मातीच्या पणत्यांचा प्रकाश असू दे, निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास असू दे! फटाक्यांचा धूर नको, प्रदूषणाचा भार नको!" असा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यशाळेला मुख्याध्यापक गोविंदराव जाधव व सहशिक्षक महेश इंगोले यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्मितीचा आनंद, श्रमप्रतिष्ठा, पारंपरिक कलेचे जतन आणि पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली. या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी सरपंच संतोष किंजवडेकर, उपसरपंच विनय पाडावे, ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत तेरसे, केंद्रसमन्वयक चिदानंद कोळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्वी पुजारे व उपाध्यक्षा ऋतुजा सुर्वे यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →