बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन

📅 ११ नोव्हेंबर, २०२६👁 १ब्रेकिंग
भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन

*कोंकण एक्सप्रेस

*भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन

"स्वर दीपावलीतून" रत्नागिरीकरांना सुरांची पर्वणी; अमोल बावडेकर, ईशानी पाटणकर यांच्या गायनाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध!

*रत्नागिरी : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दीपावली’ या संगीतमय कार्यक्रमाला आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थिती लावली. अभंग, भक्तीगीत आणि प्रसिद्ध भावगीतांच्या सुरेल सादरीकरणाने रत्नागिरीकर रसिकांना संगीताची अविस्मरणीय मेजवानी अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते कलेची देवता नटराज यांना वंदन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी त्यांनी समस्त रत्नागिरीवासीयांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेते व गायक अमोल बावडेकर आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम, रत्नागिरीची सुकन्या व प्रसिद्ध पार्श्वगायिका ईशानी पाटणकर यांची सुरेल मैफल ठरली. दोन्ही कलाकारांनी आपल्या दमदार आवाजाने अभंग, भक्तिगीते आणि लोकप्रिय भावगीतांचे सादरीकरण करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुमधुर गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. संपूर्ण वातावरण भक्तिरस आणि संगीताच्या स्वरांनी भारावून गेले होते.

दीपावलीच्या आनंदोत्सवाला संगीताची सुंदर जोड देणाऱ्या या कार्यक्रमाला रत्नागिरीकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देतानाच सांस्कृतिक परंपरा जपण्याचा सुंदर प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.

यावेळी रत्नागिरी भाजपचे ज्येष्ठ नेते विलास पाटणे, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, मनोज पाटणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

रत्नागिरी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →