जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक

*कोंकण एक्सप्रेस
*जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक
*पाच विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड
*पुन्हा एकदा जिल्ह्याची कॅरम चॅम्पियनशिप कनेडी हायस्कूल कडेच
*कणकवली-कानेडी : प्रतिनिधि
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा सन २०२६-२७ नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाली. या स्पर्धेवर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेने दरवर्षी प्रमाणे आपले वर्चस्व राखले व स्पर्धेची चॅम्पियनशीप पुन्हा एकदा प्राप्त केली. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण २२० पेक्षा जास्त कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रशालेतील एकूण ५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. या स्पर्धेत कोणत्याही एका शाळेचे सर्वाधिक यशस्वी स्पर्धक कनेडी हायस्कूलचेच आहेत हे विशेष. सदर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे -
१४ वर्षाखालील मुली -
कु . मीरा मकरंद आपटे इ. आठवी (द्वितीय क्रमांक )
१९ वर्षाखालील मुली -
कु. श्रेया राजेंद्र महाडिक इ. १२वी (प्रथम क्रमांक ), कु. दिशा गणपत पवार इ. १२वी (द्वितीय क्रमांक), कु. ऋतुजा दिपक पेडणेकर इ १२वी (तृतीय क्रमांक)
१९ वर्षाखालील मुले-
जयदीप अर्जुन कदम इ. १२वी (तृतीय क्रमांक)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पूर्वी सुद्धा याच प्रशालेच्या कु. दिक्षा चव्हाण हिने सलग तीन वेळा राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करत महाराष्ट्र राज्याचे तसेच प्रशालेचे नाव उज्ज्वल केले होते. कु. श्रेया महाडीक, कु. अनुश्री सावंत, कु. सृष्टी सावंत, कु. मीरा आपटे या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सुद्धा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते.
सर्वांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्कृत तथा इंग्रजी विषय शिक्षक व कॅरम पंच श्री. मकरंद आपटे, जिल्ह्यातील प्रसिद्ध कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव व क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले.
शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत, मुख्याध्यापक श्री. सुमंत दळवी, कॅरम प्रशिक्षक श्री. मकरंद आपटे, सहाय्यक शिक्षक श्री. डी. व्ही. सावंत व सहाय्यक शिक्षिका श्रीम. पी. एल्. हाटले
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगपोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर
ब्रेकिंगदिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!
ब्रेकिंगसिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग
ब्रेकिंग