रविवार, ८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर• निसर्गाचे रक्षण हीच खरी दिवाळी!• उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’• सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर• निसर्गाचे रक्षण हीच खरी दिवाळी!• उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’• सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त

पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर

📅 ८ नोव्हेंबर, २०२६👁 १३ब्रेकिंग
पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर

*कोंकण एक्सप्रेस

*पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर

*कणकवली : प्रतिनिधी

पोलीस हवालदार स्मिता सचिन माने हीच्या चारित्र्यावरून संशय घेऊन शारिरीक व मानसिक छळ करत पट्ट्याने मारहाण करत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सचिन अशोक माने याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

मयत स्मिता माने हीची बहिण रेश्मा जाधव हिने दिलेल्या फिर्यादीनुसार स्मिता व सचिन यांचे लग्न दहा वर्षापुर्वी झाले होते. लग्न झाल्यापासून स्मिता हीला पती सचिन कोणत्या ना कोणत्या कारणावरून मारहाण करत असे. अलिकडेच एक महिन्यापासून सचिन हा चारित्र्यावर संशय घेऊन लागला होता. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उभयतांचे भांडण झाले व फिर्यादीला फोन आला. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सचिन याने सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान स्मिता बेपत्ता झाल्याचे फिर्यादीला कळविले. तीचे बडिल, भावजी व पती यांनी कोल्हापूर, खेड येथे शोध घेतला. त्यावेळी फिर्यादी घरी गेली असता तीला घरामध्ये लांब केस पडलेले दिसले. त्यांचा मुलगा सार्थक याने बडिलांनी आईला पट्टचाने मारल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपीने पत्नीचे अपहरण झाल्याची खबरही पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी तीचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे येथे काजू बागेत गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. फिर्यादीने आरोपीच्या छळाला कंटाळून गळफास घेतला असावा किंवा तीचा घातपात झाला असावा अशी फिर्यादी दिली होती. याबाबत भा.न्या.सं. १०८, ११५ (२), ११८ (१) नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली होती.

अटकेतील तपासात मयत ही एसटी बसने हुंबरणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीतर्फे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असता सुनावणीअंती न्यायालयाने सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये, तपासात सहकार्य करावे, पोलीस खात्यात नोकरी करत असल्याचा गैरफाफदा घेऊ नये आदी अटी घातल्या आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →