तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू

*कोंकण एक्सप्रेस
*तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू
*जलद कृती दलासह वनविभागाची घटनास्थळी धाव; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन
*कणकवली : प्रतिनिधी
तळेरे येथील वाघाचीवाडी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची वनविभागाने तात्काळ दखल घेत परिसरात रात्रगस्त सुरू केली असून, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी रात्री संतोष लाड हे दुचाकीवरून घरी जात असताना रात्री ८ वाजता अचानक त्यांच्या समोर बिबट्या आल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच तासाभरात वनविभागाचे कर्मचारी आणि कणकवली येथील जलद कृती दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांना आवश्यक सूचना देत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी वनविभाग आणि जलद कृती दलाच्या सदस्यांनी तळेरेचे पोलीस पाटील मोहन भोगले, निलेश पवार, राजेश भोगले तसेच अन्य ग्रामस्थांच्या समवेत वाघाचीवाडी परिसरात पाहणी केली. यावेळी वाघाचीवाडी तलाव परिसरासह बिबट्याचा वावर असलेल्या भागात फिरती करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, रात्रीच्या वेळी वनविभागामार्फत नियमित गस्त सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर जाणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर
ब्रेकिंगजिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक
ब्रेकिंगपोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर
ब्रेकिंग