४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!

*कोंकण एक्सप्रेस
*४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!
*शालेय गटासाठी १० हजार, तर खुल्या गटासाठी ३० हजारांचे प्रथम पारितोषिक
*राज्यभरातील नाट्यसंघांना सहभागाचे आवाहन
*कणकवली : प्रतिनिधी
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित प्रतिष्ठेची ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा दि. २४ ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत कणकवली येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष असून, सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रती वर्षा प्रमाणे यावर्षीही स्पर्धेचे आयोजन शालेय व खुल्या अशा दोन गटांत करण्यात आले आहे. दि. २४ व २५ डिसेंबर रोजी शालेय गटाच्या, तर दि. २६, २७ व २८ डिसेंबर रोजी खुल्या गटाच्या एकांकिका सादर होणार आहेत.
स्पर्धेतील पारितोषिके आकर्षक स्वरूपाची असून शालेय गटासाठी सांघिक रोख पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांकास रुपये १०,०००/-, द्वितीय क्रमांकास रुपये ७,५००/- व तृतीय क्रमांकास रुपये ५,०००/- अशी पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत.
खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकास रुपये ३०,०००/-, द्वितीय क्रमांकास रुपये १५,०००/- व तृतीय क्रमांकास रुपये १०,०००/- अशी रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय दिग्दर्शन, तांत्रिक व अभिनय या विभागांसाठी स्वतंत्र रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या प्रवेशासाठी शालेय गटाकरिता रुपये १,०००/- व खुल्या गटाकरिता रुपये २,०००/- प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२६ अशी आहे. इच्छुक नाट्यसंघांनी प्रतिष्ठानच्या गुगल फॉर्मद्वारे आपली प्रवेश नोंदणी पूर्ण करावी.
नाथ पै एकांकिका स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील हौशी रंगभूमीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आणि नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणारी एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक परंपरा आहे. आता सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या या स्पर्धेचे यंदाचे वर्ष विशेष उत्साहात साजरे करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नाट्यसंस्था, महाविद्यालयीन व शालेय नाट्यसंघांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला सादर करण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे कार्यवाह शरद सावंत यांच्याशी मोबाईल क्रमांक ९४२२५८४०५४ किंवा ८८३०१८०८८५ यावर संपर्क साधावा.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगभाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन
ब्रेकिंगस्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे
ब्रेकिंग*घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!
ब्रेकिंग