शिरगाव-साळशी मार्गावरील वळणावर अपघाताची शक्यता

*कोंकण एक्सप्रेस
*शिरगाव-साळशी मार्गावरील वळणावर अपघाताची शक्यता
*शिरगाव : संतोष साळसकर
देवगड तालुक्यातील शिरगाव- साळशी मार्गावर माडखोलजवळ ओहोळानजीकच्या वळणावर रस्त्याचा काही भाग खचला आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी उभी केलेली रिकामी लोखंडी बॅरलच आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. बॅरलवर पांढरे पट्टे किंवा रेडियम नसल्याने रात्रीच्या वेळी भरधाव येणाऱ्या वाहनचालकांना ती सहज दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९ असून हा देवगड, कणकवली आणि मालवण या तीन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. खारेपाटण, वेळगिवे, ओंबळ, शिरगाव, साळशी, कुवळे, सांडवे, रामगड मार्गे मालवणकडे जाणाऱ्या या रस्त्यावर पर्यटकांसह प्रवासी, खासगी वाहने आणि एसटीची वर्दळ असते.
या मार्गावरील अनेक ठिकाणी वळणे आहेत व तीव्र उताराचा रास्ता असून काही भागांत साईटपट्टीही खचली आहे. माडखोलजवळील वळणावर रस्त्याचा भाग खचल्याने तात्पुरत्या स्वरूपात बॅरल उभी करण्यात आली. मात्र, वळण आणि चढावामुळे रात्रीच्या वेळी ती वाहनचालकांच्या नजरेस ती सहजच पडत नाहित. आजारापेक्षा उपचार जालीम.. अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही स्थिती कायम असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने खचलेल्या रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. तसेच बॅरलवर पांढरे पट्टे व रेडियम लावून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
जाहिरातदेवगड मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगकर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड
ब्रेकिंगपर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त

तळेरे येथील कु. सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड
ब्रेकिंग