रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या मच्छीमारांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देणार! – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे• पालक सचिव वीरेंद्रसिंह यांचे जि प अध्यक्षांकडून स्वागत• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली• दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या मच्छीमारांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देणार! – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे• पालक सचिव वीरेंद्रसिंह यांचे जि प अध्यक्षांकडून स्वागत• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली

तळेरे येथील कु. सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड

सार्थक हा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी: अभिनंदनाचा वर्षाव

📅 २५ ऑक्टोबर, २०२६👁 ८
तळेरे येथील कु. सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*तळेरे येथील कु. सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड*

*सार्थक हा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी: अभिनंदनाचा वर्षाव*

*शिरगांव : संतोष साळसकर*

कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता आठवीत शिकणाऱा विद्यार्थी आणि तळेरे गावातील रहिवासी असलेला कुमार सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्रच अभिनंदन केले जात आहे.

नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या निवड चाचणीत सार्थक वायंगणकर याने चांगली चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांची चौदा वर्षांखालील मुलांच्या सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. तो उत्कृष्ट फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून कामगिरी बजावत आहे. गेल्या चार वर्षांपासून तो ओझरम येथील शिवमुद्रा ॲकडमीचे प्रशिक्षक मयुर गोरुले आणि वैभववाडी येथील अनय स्पोर्ट्स ॲकडमीचे प्रशिक्षक सुमेध कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेदर बाॅल क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. त्याचबरोबर शालेय गटातील कॅरम आणि स्वॅश खेळात देखील चमकदार कामगिरी बजावली आहे. सार्थक हा तळेरे येथील क्रिकेटपट्टू आणि राजवैभव चायनीज सेंटर व हॉटेल लॉजिंग संचालक राजकुमार वायंगणकर यांचा चिरंजीव आहे.

कु. सार्थक याच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बिसूरे, विद्यालयाच्या संस्थेचे पदाधिकारी तसेच तळेरे येथील श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कु. सार्थक याच्या निवडीबद्दल तळेरे गावचे माजी सरपंच आणि श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाचे जुन्या फळीतील खेळाडू व पदाधिकारी शशांक तळेकर यांच्या हस्ते सार्थक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, निलेश सोरप, राजकुमार वायंगणकर, संजय खानविलकर, प्रकाश वायंगणकर, शरद वायंगणकर, पोलीस दलातील गणेश भोवड, अभिमन्यू पाताडे तसेच वायंगणकर कुटुंबातील सर्व नातेवाईक उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →