बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम• कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड• सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर - भवानी शंकर• ऊसाला जादा दर देण्याचा प्रयत्न करु : आ.सतेज पाटील• अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.. ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी• ग्राम महसूल अधिकारीपदी सानिका मुसळे हिची नियुक्ती• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम• कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड• सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर - भवानी शंकर• ऊसाला जादा दर देण्याचा प्रयत्न करु : आ.सतेज पाटील• अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.. ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी• ग्राम महसूल अधिकारीपदी सानिका मुसळे हिची नियुक्ती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार

📅 २८ ऑक्टोबर, २०२६👁 ६ब्रेकिंग#zpsindhudurg
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार

*कोंकण एक्सप्रेस

*प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार

*राज्यातील 91.13 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1835 कोटी रुपयांचा लाभ

*सिंधुदुर्गनगरी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 या कालावधीतील 24 वा हप्ता शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशभरात 30 ऑक्टोबर रोजी ‘पीएम-किसान उत्सव दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांत, प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जातात. राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी 23 हप्त्यांद्वारे सुमारे 42 हजार 935 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी भूमी अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या राज्यातील सुमारे 91.13 लाख शेतकरी कुटुंबांना 24 व्या हप्त्यापोटी अंदाजे 1 हजार 835 कोटी रुपयांचा लाभ 30 ऑक्टोबर रोजी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांत जमा होणार आहे.

पीएम-किसान योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी असणेही केंद्र शासनाने आवश्यक केले आहे. शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात कृषी विभाग, महसूल व वन विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) येथे हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी या संकेतस्थळाद्वारे कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →