बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम• कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड• सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर - भवानी शंकर• ऊसाला जादा दर देण्याचा प्रयत्न करु : आ.सतेज पाटील• अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.. ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी• ग्राम महसूल अधिकारीपदी सानिका मुसळे हिची नियुक्ती• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम• कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड• सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर - भवानी शंकर• ऊसाला जादा दर देण्याचा प्रयत्न करु : आ.सतेज पाटील• अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.. ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी• ग्राम महसूल अधिकारीपदी सानिका मुसळे हिची नियुक्ती

कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड

📅 २८ ऑक्टोबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड

*कोंकण एक्सप्रेस

*कर्ले महाविद्यालयाच्या सिद्धी सावळेची 'करिअर कट्टा' दिल्ली दौऱ्यासाठी निवड

​*शिरगांव : संतोष साळसकर

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणऱ्या करिअर कट्टा विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या नजरे समोर राष्ट्र... हृदयात महाराष्ट्र... या उपक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी सुभाष सावळे हिची दिल्ली दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

​सिद्धी सावळे ही तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असून तिने मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या आणि संपूर्ण कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या केवळ ११ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये या कोकण कन्येचा समावेश झाला आहे.

​या उपक्रमांतर्गत २५ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या दिल्ली दौऱ्यात सिद्धीला देशाच्या राजधानीतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, शिरगांव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, प्राचार्य समिर तारी, करिअर कट्टाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे,जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिघे, देवगड तालुका सन्वयक प्रा. अक्षता मोंडकर, सहाय्यक प्रा. कोमल पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →