शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा

📅 ३१ ऑक्टोबर, २०२६👁 ९ब्रेकिंग
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा

*कोंकण एक्सप्रेस

*पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा

*मा.आ.परशुराम उपरकर, मा.आ. वैभव नाईक,अमित सामंत,अभय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती

*कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या अगदी काठावर एका परप्रांतीय व्यक्तीने गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करून तेथील पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. तेथील तलाव स्वमालकीचे दाखवून त्याची जाहिरात करून प्लॉट विक्री केली जात आहे. १८५० नळधारक ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.मात्र या गृहनिर्माण प्रकल्पातील सांडपाणी थेट तलावात मिसळले जाणार असल्याने त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा असलेला मुख्य स्त्रोत प्रदूषित होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार असून या विरोधात पिंगुळीतील स्थानिक ग्रामस्थांनी २ नोव्हेंबर २०२६ पासून आंदोलनाचा आणि उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलन आणि उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेसचे विजय प्रभू,सचीन ठाकूर, बाबल गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी आदि उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →