शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान• मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!• देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न• सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ! लोकसहभागातून १० हजार ४३९ वनराई बंधारे पूर्ण• शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी• छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादीच• कांदळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश• देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा• सेवा संकल्प अभियान पंचायत समिती कुडाळ, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!

📅 ३१ ऑक्टोबर, २०२६👁 ३ब्रेकिंग
मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!

*कोंकण एक्सप्रेस

*मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण!

*मुंबई

अस्मानी संकट कोसळले आणि दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शेतात पीक नाही, घरात आर्थिक अडचणी आणि अशा परिस्थितीत दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबांसमोर उभा होता.

अशा कठीण प्रसंगी शिवसेना महायुती सरकारने तातडीने दिलासा देणारे निर्णय घेतले. पण फक्त सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हाक दिली. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची व्हावी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे तब्बल २०० ट्रक रवाना करण्यात आले.

आज शिवसेनेच्या या अभियानातून राज्याच्या विविध दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचत आहे. विदर्भ, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा विभागातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक दिवाळीच्या शिध्याचे वाटप करत आहेत.

शिध्याची पिशवी स्वीकारताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तरळणारे आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे हसू, हे या अभियानाचे खरे यश आहे. कारण या शिध्यासोबत शिवसेना प्रत्येक शेतकरी कुटुंबाला एक विश्वास देत आहे की, संकट कितीही मोठे असले तरी तुम्ही एकटे नाहीत, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे!

शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या सोबत उभे राहणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू राहण्यासाठी प्रयत्न करणे, हीच शिवसेनेची सामाजिक बांधिलकी आहे.

बळीराजाच्या घरची दिवाळीही आनंदाने साजरी व्हावी या भावनेतून मा . एकनाथजी शिंदे साहेबांनी हा मदतीचा उपक्रम सुरू आहे. कारण शिवसेनेसाठी ही केवळ मदत नाही, तर शेतकरी बांधवांप्रती असलेली आपुलकी आणि माणुसकीची बांधिलकी

#MaharashtraDrought

#droughtrelief

#supportingfarmers

#shetkari

#दुष्काळ #दुष्काळग्रस्त #FarmersSupport

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →