इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी

*कोंकण एक्सप्रेस
*इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी;
*31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
*सिंधुदुर्गनगरी
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) रविवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2027 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र आणि नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र दि. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत भरावेत असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
नियमित मुदतीनंतर उमेदवारांना विलंब शुल्कासह 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत, अतिविलंब शुल्कासह 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2026 या कालावधीत, तर अति विशेष विलंब शुल्कासह 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. दिनांक 31 डिसेंबर 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
परीक्षेचे वेळापत्रक, स्वरूप, पात्रता निकष, परीक्षेचे माध्यम आणि शुल्क भरण्याची पद्धत याविषयीची सविस्तर अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत भरावेत.
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगनाईक ट्रॅव्हल्स (NAIK TRAVELS)
ब्रेकिंगमत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
ब्रेकिंगघनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
ब्रेकिंग