शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली• सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत• माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली• सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत• माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी

माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी

📅 २२ ऑक्टोबर, २०२६👁 १३ब्रेकिंग
माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी

*कोंकण एक्सप्रेस

*माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी

*सावंतवाडी - प्रतिनिधि

महादेव नानू तेली (वय 56, रा. माणगाव, ता. कुडाळ) हे बुधवारी रात्री 8 वाजता आपल्या घरी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला.

अपघातानंतर तेथील ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना माणगाव उप आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सभा खान डॉक्टर प्रभाकर शिंगाडे डॉक्टर स्वप्ना सागर यांनी त्यांच्यावर औषध इंजेक्शनचा उपचार करून सिटीस्कॅन करण्यात आला. डोक्याला व हाताला दुखापत झाली असून सध्या त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी दिली.

या घटनेची माहिती सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून पोलिसांना कळविण्यात आली असून फरार दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →