मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची सावंतवाडीत जनजागृती रॅली

घोषणांतून दिला स्वच्छता, पर्यावरण व मोबाईल वापराबाबत संदेश....

📅 ३ ऑक्टोबर, २०२६👁 ३
गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची सावंतवाडीत जनजागृती रॅली

*कोंकण एक्सप्रेस

*गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची सावंतवाडीत जनजागृती रॅली

*घोषणांतून दिला स्वच्छता, पर्यावरण व मोबाईल वापराबाबत संदेश....

*सावंतवाडी ; प्रतिनिधी

महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आज सावंतवाडी शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. विविध सामाजिक विषयांवरील घोषणांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांना कृतीची जोड दिली

‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘माणूसकी जपा’, ‘स्वच्छता राखा’ अशा विविध घोषणांनी रॅलीदरम्यान परिसर दुमदुमून गेला. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. नारायण मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख बाजारपेठेतून मार्गक्रमण करत रॅली गांधी चौकात पोहोचली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून महात्मा गांधीजींचा सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. तसेच आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वापर जबाबदारीने आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा संदेशही पथनाट्यातून देण्यात आला.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला आणि जनजागृतीपर घोषणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापुरुषांच्या विचारांची केवळ जयंतीपुरती आठवण न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमात शाळेच्या उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षिका उमा झारापकर, रसिका कंग्राळकर, महिमा चारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. नारायण मंदिर येथून सुरू झालेली ही रॅली शहरातील बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा त्याच ठिकाणी आल्यानंतर तिची सांगता झाली.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →