गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट• सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट• सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम

नाबार्ड मुख्य महाव्यवस्थापकांसह महाव्यवस्थापकांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

📅 १५ ऑक्टोबर, २०२६👁 ३#नितेश राणे#सिंधुदुर्ग
नाबार्ड मुख्य महाव्यवस्थापकांसह महाव्यवस्थापकांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

*कोंकण एक्सप्रेस

*नाबार्ड मुख्य महाव्यवस्थापकांसह महाव्यवस्थापकांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

*कृषी व ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर मंत्रालयात विचारविनिमय

*मुंबई

नाबार्डचे (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) महाराष्ट्राचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर आणि महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांनी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नाबार्ड आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील सहकार्य तसेच कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

मंत्री नितेश राणे यांनी या भेटीची माहिती आपल्या 'एक्स' (X) या समाजमाध्यम खात्यावरून दिली. नाबार्ड आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील सहकार्याच्या विविध शक्यता तसेच कृषी व ग्रामीण विकासाशी निगडित विषयांवर यावेळी विचारविनिमय झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

कृषी क्षेत्राच्या विकासासोबतच ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन आणि नाबार्ड यांच्यातील समन्वयाला महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत कृषी व ग्रामीण विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →