भारतीय मजदूर संघच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी ओमकार दिपक गुरव यांची फेरनिवड: मातीतील संघर्ष ते कामगार चळवळीचे प्रेरणादायी नेतृत्व

*कोंकण एक्सप्रेस*
*भारतीय मजदूर संघच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी ओमकार दिपक गुरव यांची फेरनिवड: मातीतील संघर्ष ते कामगार चळवळीचे प्रेरणादायी नेतृत्व!*
सिंधुदुर्ग :
भारतीय मजदूर संघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कणकवली येथे पार पडले. या अधिवेशनात साळिस्ते गावचे सुपुत्र ओमकार दिपक गुरव यांची सिंधुदुर्ग जिल्हा कोषाध्यक्षपदी सर्वसम्मतीने फेरनिवड करण्यात आली आहे. सामान्यपणे या महत्त्वाच्या पदासाठी अनुभवी वरिष्ठ कार्यकर्ते किंवा निवृत्त बँक कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, ओमकार गुरव यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून, सातत्यपूर्ण योगदानामुळे आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेतून मिळवलेला विश्वास या फेरनिवडीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
सन २०२४ मध्ये झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात पहिल्यांदाच त्यांच्यावर जिल्हा कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी त्यांना या पदाचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. तरीही संघटनेने दाखवलेला विश्वास त्यांनी आपल्या कामातून सार्थ ठरवला. आर्थिक कामकाजातील शिस्त, जबाबदारीचे भान आणि संघटनात्मक निष्ठेच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनुभवापेक्षा कामावरील निष्ठा आणि कर्तृत्वाला महत्त्व देणारी ही निवड कामगार चळवळीत कौतुकाचा विषय ठरली आहे.
मूळचे साळिस्ते गावचे रहिवासी असलेले ओमकार गुरव यांना समाजकारणाचा वारसा त्यांचे वडील स्वर्गीय दिपक पांडुरंग गुरव यांच्याकडून लाभला आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे सामाजिक कार्य पुढे नेण्याचा संकल्प करत त्यांनी साळिस्ते गावातून आपल्या सामाजिक प्रवासाची सुरुवात केली. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे, कामगारांचे प्रश्न लावून धरणे, शैक्षणिक उपक्रम राबवणे आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामाजिक आणि शासकीय क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांनी गावापासून जिल्हास्तरापर्यंत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कोषाध्यक्ष पदाची अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची धुरा सांभाळण्यासाठी लागणारी आर्थिक पारदर्शकता, उच्चैक्षणिक पार्श्वभूमी (व्यवस्थापन शाखेतील उच्च शिक्षण), संघटन कौशल्य आणि कामगार हिताची तळमळ हे सर्व गुण ओमकार गुरव यांच्यामध्ये उत्तम प्रकारे जुळून आले आहेत. याच व्यावसायिक व योग्य अनुभवाच्या जोरावर ते हे पद अत्यंत समर्थपणे आणि सक्षमतेने सांभाळतील, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा आजवरचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला असून, कौटुंबिक व आर्थिक पातळीवरील अनंत अडचणींना धैर्याने तोंड देत त्यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण केले. हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास कधीच सोडली नाही आणि कष्टाच्या बळावर स्वतःचे आयुष्य घडवले. त्यांचा हा प्रेरणादायी संघर्ष आजच्या युवा पिढीसाठी एक दीपस्तंभ ठरला आहे. या खडतर संघर्षासोबतच त्यांना त्यांच्या वडिलांच्या सामाजिक कार्याचा आणि निष्ठेचा अखंड वारसा लाभला आहे. "माणुसकी आणि जनसेवा" हेच जीवनध्येय मानून आयुष्यभर समाजकारण करणाऱ्या वडिलांच्या विचारांचा वसा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पुढे चालवला आहे. लहानपणापासूनच घरात मिळालेले प्रामाणिकपणाचे बाळकडू, लोकांच्या अडीअडचणीत मदतीसाठी अहोरात्र धावून जाण्याची प्रवृत्ती आणि निस्वार्थी भावनेचे संस्कार यामुळे त्यांच्या स्वभावातच नेतृत्वगुण रुजले आहेत.
आजवर त्यांनी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग, बांधकाम कामगार संघ, घरेलू कामगार संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा कामगार संघ अशा विविध संघटनांमध्ये जिल्हा कोषाध्यक्ष व संघटन मंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. तसेच केंद्र शाळा साळिस्ते नं. १ माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, तंटामुक्त समितीमध्ये युवक प्रतिनिधी अश्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी समाजसेवेचा वसा अखंड सुरू ठेवला आहे.
एका सामान्य कुटुंबातील तरुणाने वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवलेले हे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या फेरनिवडीमुळे कणकवली तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जाहिरातमालवण मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगतारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा
ब्रेकिंगस्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा
ब्रेकिंगमालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व

