मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण

कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर

📅 २७ ऑक्टोबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर

*कोंकण एक्सप्रेस

*कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर;

*प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडून जागेची पाहणी

*सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार दिनांक 22 नोव्हेंबर 2026 रोजी भव्य कायदेविषयक सेवा शिबीराचे (Mega Legal Services Camp) आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी कसाल (ता. कुडाळ) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जागेची निवड करण्यात आली असून, नुकतीच या परिसराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्ह्यातील सर्व वकील संघ तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने 'नाल्सा'च्या (NALSA) नवीन मॉड्यूलनुसार जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने हे शिबीर आयोजित केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत 22 ऑक्टोबर 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथील परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली. सर्व सोयी-सुविधांचा आढावा घेतल्यानंतर शिबीरासाठी हे ठिकाण निश्चित करण्यात आले.

या पाहणी दरम्यान जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (ग्रामपंचायत) परेश शिरसाट, मंडळ अधिकारी अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कनिष्ठ अभियंता शिकांत शिंदे उपस्थित होते.

तसेच जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक एम. आर. माणगांवकर, एस. डी. गिरकर, एन. एस. सावंत, सहायक अधीक्षक एस. एच. खेडेकर व इतर न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन अवधुत मालणकर, सेक्रेटरी आशिष परब आणि मुख्याध्यापक उत्तम मळगावकर यांनीही यावेळी उपस्थित राहून पाहणीत सहकार्य केले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →