मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न

📅 २७ ऑक्टोबर, २०२६👁 ०ब्रेकिंग#zpsindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न

*कोंकण एक्सप्रेस

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न

*1 हजार 77 नवसाक्षर परीक्षार्थी सहभागी; 901 महिला व 176 पुरुषांचा समावेश

*सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 195 परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेस जिल्ह्यातील एकूण 1 हजार 77 परीक्षार्थी प्रविष्ट झाले. यामध्ये 901 महिला व 176 पुरुषांचा समावेश आहे.

राज्यात सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशातील 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींना वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाचे मूलभूत शिक्षण देणे, तसेच त्यांच्यामध्ये दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी विविध जीवनकौशल्ये विकसित करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या मूल्यमापन चाचणीसाठी सन 2026 मध्ये शाळांमार्फत ‘उल्लास’ ॲपवर नोंदणी केलेल्या निरक्षर व्यक्ती तसेच दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या चाचणीमध्ये ‘निड इम्प्रूव्हमेंट’ (Need Improvement) असा निकाल लागलेल्या परीक्षार्थींनी सहभाग घेतला.

या परीक्षेत विहित निकषांनुसार उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनामार्फत प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यविषयक जागरूकता, बालसंगोपन व शिक्षण आणि कुटुंबकल्याण यांसारखी महत्त्वपूर्ण जीवनकौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच नवसाक्षरांना स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पुनर्कौशल्य आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

जिल्ह्यात ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रसमन्वयक, विषयतज्ज्ञ, साधनव्यक्ती, डेटा एन्ट्री ऑपरेटर, तालुकास्तरीय पर्यवेक्षकीय यंत्रणा, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक, स्वयंसेवक आणि अन्य सहभागी यंत्रणांनी सहकार्य केले.

या परीक्षेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साहिल आणि शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती प्रितेश राऊळ यांनी संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले, अशी माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी (योजना) फारुखी अहमदी हाजी अफसरोहीन यांनी दिली.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →