मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण• तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा• थेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!• स्थानिक मच्छिमारांची बांधकामे नियमित करा व ‘किनारपट्टी समन्वय समिती’ स्थापन करा• वैश्य वाणी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा मुंबईत सत्कार• महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• सिंधुदुर्ग जिल्ह्यात 195 केंद्रांवर उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन चाचणी संपन्न• कसाल येथे 22 नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबीर• पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्या – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम• मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे ओवळीये येथे जलसंधारण कामात श्रमदान• सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण

महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

📅 २७ ऑक्टोबर, २०२६👁 २ब्रेकिंग#zpsindhudurg
महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*कोंकण एक्सप्रेस

*महर्षी वाल्मिकींचे जीवनचरित्र आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

*सिंधुदुर्गनगरी

महर्षी वाल्मिकी यांचे जीवनचरित्र आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य आपल्याला सातत्याने आत्मपरीक्षण करण्याची, स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याची आणि जीवनात उच्च मूल्यांची जोपासना करण्याची प्रेरणा देते. व्यक्तीची महानता तिच्या भूतकाळावर नव्हे, तर तिच्या विचारांवर, परिश्रमांवर आणि कृतीवर ठरते, हा संदेश महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातून मिळतो. रामायणातील आदर्श मूल्ये आत्मसात करून ती भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त केले.

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासासह भारतीय साहित्यविश्वाला त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महर्षी वाल्मिकी यांना भारतीय परंपरेत आदिकवी म्हणून गौरविण्यात येते. संस्कृत भाषेत रचलेल्या रामायण या महाकाव्यात सात कांडांमधून श्रीरामांचे जीवन, त्यांचा आदर्श, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि नैतिक मूल्यांचे दर्शन घडते. सुमारे २४ हजार श्लोकांचा समावेश असलेल्या या महाकाव्याने भारतीय समाजजीवन, साहित्य आणि संस्कृतीवर दीर्घकालीन प्रभाव टाकला आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →