शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली• सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत• माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी• आंब्रड येथे नालसा योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी ६० दिवसीय मेगा ड्राईव्ह• कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा• काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या!• पालक सचिव वीरेंद्र सिंह यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा• विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासह विविध योजनांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा• महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!• जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली• सिंधुदुर्गनगरीतील पाणीटंचाई निवारणासाठी समिती गठीत• माणगाव येथे हिट अँड रन; 56 वर्षीय व्यक्ती जखमी

जल्लोषी भक्तीमय वातावरणात नवदुर्गेच विसर्जन- देवी विर्सजनवेळी भाविकांचे नयन पाणावले

📅 २२ ऑक्टोबर, २०२६👁 १७ब्रेकिंग
जल्लोषी भक्तीमय वातावरणात नवदुर्गेच विसर्जन-  देवी विर्सजनवेळी भाविकांचे नयन पाणावले

*कोंकण एक्सप्रेस

*जल्लोषी भक्तीमय वातावरणात नवदुर्गेच विसर्जन-

*देवी विर्सजनवेळी भाविकांचे नयन पाणावले

* फोंडाघाट : संजना हळदिवे

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) आयोजीत सार्वजनिक नवरात्रौत्सव देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन सलग २४ व्या वर्षी शारदीय नवरात्ररंभ घटस्थापना ते विजयादशमी दसरा या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा करुन बुधवार दि.२१/१०/२०२६ रोजी नवदुर्गाचे विसर्जन ढोल ताशाच्या पथकांचा गगनभेदी आवाज, पारंपारिक फुगडी नृत्य, तसेच गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी पाऊले, फटाक्याची आतषबाजीने विसर्जन मिरवणुक नवीन कुर्ली- फोंडाघाट बाजार पेठ- मारुती वाडी अशा मिरवणुकीने दुर्गामातेचे विसर्जन करण्यात आले.

नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) या मंडळाकडुन गेली २४ वर्षे नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये मुलां- मुलींकरीता वेशभुषा स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, विविध फनी गेम, महिलांकरीता हळदीकुंकू,खेळ पैठणीचा, फुगडी नृत्य, गरबा नृत्य तसेच भजन, हरिपाठ, किर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबीर यासारखे सामाजिक उपक्रम राबवले होते. फोंडाघाट दशक्रोषीमध्ये नवसाला पावणा-या या देवी दुर्गामातेच्या उत्सवात पालकमंत्री ना.नितेश राणे सहीत राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देवी दुर्गामातेचे दर्शन घेतले होते.

विजयादशमी दस-यानंतर या देवीचे विर्सजन करण्यात आले. भक्तीमय व आनंदाच्या वातावरणात विर्सजन मिरवणुक सोहळ्यास नवदुर्गा युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी, गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या विसर्जन मिरवणुकीमध्ये दुर्गामातेच्या मुर्तीची सजावट, पुरुषांचे एका कलर मधील पांढरा सदरा ड्रेस कोड व महिलांचे एका कलरचे साडी ड्रेस कोड लक्ष वेधुन घेत होते. विसर्जन सोहळ्यास भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. उशीरापर्यत चाललेल्या मिरवणुकीनंतर रात्री फोंडाघाट मारुती मंदिर नजीक उगवाई नदीवर भाविकांच्या पाणावलेल्या नयनानी दुर्गामातेचे विसर्जन करण्यात आले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →