मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर

📅 २२ सप्टेंबर, २०२६👁 १८ब्रेकिंग
कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर

*कोंकण एक्सप्रेस

*कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर

*कुडाळ :- प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी सनराईज हॉस्पिटल, कोल्हापूरच्या वतीने कुडाळ आणि कणकवली येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात रविवार, 27 सप्टेंबर रोजी, तर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात हृदयविकार, मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, व्हेरिकोज व्हेन्स तसेच मणक्याच्या आजारांबाबत तपासणी करून पुढील उपचार व ऑपरेशनसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) पात्र रुग्णांना विविध उपचारांचा लाभ घेता येणार असून, अँजिओप्लास्टी, लहान छिद्रातून बायपास ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेटवरील उपचार, पित्ताशयातील खड्यांवरील शस्त्रक्रिया, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार तसेच मणक्यावरील शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याशिवाय थायरॉईड गाठी तसेच गर्भातील गाठींसाठी उपलब्ध उपचारांबाबतही तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येणार आहे.

कुडाळच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग आणि कणकवलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांची शिबिराला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा रुग्णसेवक राजेंद्र प्रभाकर मसुरकर सावंतवाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शिबिराला येताना नागरिकांनी रेशन कार्ड, आधार कार्ड व आयुष्मान कार्ड सोबत आणावे. यापूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट असल्यास तेही सोबत आणावेत. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 8928736999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

आपला विश्वासू,

राजेंद्र प्रभाकर मसुरकर

अध्यक्ष, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस, सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

मो :- 9422435760

8975857716

छायाचित्र गॅलरी (2)

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →