मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

जांभवडेचे आधारवड हरपले! माजी ग्रामविकास अधिकारी तथा माजी सैनिक मनोहर नारायण उर्फ 'भाई मडव' यांचे निधन

📅 १ ऑक्टोबर, २०२६👁 ११५
जांभवडेचे आधारवड हरपले! माजी ग्रामविकास अधिकारी तथा माजी सैनिक मनोहर नारायण उर्फ 'भाई मडव' यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*जांभवडेचे आधारवड हरपले! माजी ग्रामविकास अधिकारी तथा माजी सैनिक मनोहर नारायण उर्फ 'भाई मडव' यांचे निधन*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील माजी सैनिक, कुशाग्र बुद्धीचे, धाडसी व मनमिळाऊ स्वभावाचे धुरंधर व्यक्तिमत्त्व तथा माजी ग्रामविकास अधिकारी मनोहर नारायण मडव (भाई मडव) (वय ८५) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, "पुन्हा अशी व्यक्ती होणे नाही," अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत. 

देशसेवा आणि लष्करी कारकीर्द

भाई मडव यांनी तरुण वयात भारताच्या चीनबरोबरच्या १९६२ च्या लढाईत प्रत्यक्ष बॉर्डरवर कार्यरत राहून देशसेवा बजावली होती. हिंदी प्रबोध आणि ड्रॉइंग इलेमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ४ वर्षांची पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी सेंटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग टीममध्ये इन्स्पेक्टर म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

ग्रामविकास अधिकारी म्हणून २५ वर्षे उत्कृष्ट सेवा

लष्करी सेवेनंतर त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून २५ वर्षे यशस्वी सेवा करून निवृत्ती घेतली. आपल्या नोकरीच्या काळात त्यांनी घोटगे, कुपवडे, सोनवडे, नरडवे, भरणी, रांगणा, तुळसुली, निवजे, दारिस्ते, किंजवडे आणि तोरसोळे या गावांमध्ये रस्ते, शाळा, वीज, पाणी यांसारखी अत्यावश्यक विकासाची कामे मार्गी लावली.

तोरसोळे (देवगड) येथे शेतीमधील 'पॅडीपायलट' योजना यशस्वीपणे राबवून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.

नरडवे आणि दारिस्ते येथे बायोगॅस प्रकल्प व कुटुंब कल्याण कामाबद्दल त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला होता.

निवृत्तीनंतर सामाजिक कार्य व नेतृत्व

सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जांभवडे गावाचे उपसरपंच म्हणून ५ वर्षे जबाबदारी सांभाळली. या कार्यकाल त्यांनी नळ योजनेसह अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे उत्तमरीत्या पूर्ण केली. त्यांच्या निरपेक्ष समाजसेवेने आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी आयुष्यभर असंख्य माणसे जोडली. त्यांच्या जाण्याने परिसराचा एक भक्कम आधारवड हरपला आहे.

पारिवारिक पार्श्वभूमी

त्यांच्या पत्नी तिलोत्तमा मडव यांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, जावई, सुना, भाऊ, पुतणे, नातवंडे व नातजावई असा मोठा परिवार आहे.

ग्रामपंचायत सदस्य उदय मडव आणि कृषी अधिकारी नारायण मडव यांचे ते वडील होत. 

तसेच लतिका नाईक (पं.स. कणकवली), माया वंजारे आणि दया पवार यांचे ते वडील असून, प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक-सावंत यांचे ते आजोबा होत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कुडाळ मधील अधिक बातम्या

अधिक पहा →