छत्रपती संभाजीनगरच्या कनिष्काची थेट महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघात गरुडझेप! ४१ व्या राष्ट्रीय युवा स्पर्धेसाठी निवड
पत्रकार भाई चव्हाण यांची नात

*कोंकण एक्सप्रेस*
*छत्रपती संभाजीनगरच्या कनिष्काची थेट महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघात गरुडझेप! ४१ व्या राष्ट्रीय युवा स्पर्धेसाठी निवड*
*पत्रकार भाई चव्हाण यांची नात*
*कणकवली : प्रतिनिधी*
छत्रपती संभाजीनगर: दि. २६- छत्रपती संभाजीनगरमधील एम एस डी अकॅडमीची उगवती बास्केटबॉलपटू कनिष्का तनश्री संतोष गायकवाड हिची १६ वर्षांखालील महाराष्ट्राच्या मुलींच्या बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. पुण्यात २७ ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या आगामी 'मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय युवा बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत' ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन, जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यात गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात ४१ वी राज्यस्तरीय युवा गट बास्केटबॉल स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत राज्यभरातून ३६ मुलांचे आणि ३१ मुलींचे संघ सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेतील कठोर निवड चाचणीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेच्या खेळाडूंची निवड झाली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतून सर्वप्रथम उत्कृष्ट २७ खेळाडूंची पहिल्या नॅशनल कॅम्पसाठी निवड झाली होती. या २७ खेळाडूंमधून कडक शिस्तीच्या सरावानंतर अव्वल १७ खेळाडूंची दुसऱ्या नॅशनल कॅम्पसाठी निवड करण्यात आली. या १७ खेळाडूंच्या अंतिम चाचणीतून छत्रपती संभाजीनगरच्या कनिष्काने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या अंतिम १२ खेळाडूंच्या संघात आपले स्थान पक्के केले.
महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या यजमानपदाखाली २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पुणे येथे 'मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय युवा बास्केटबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत कनिष्का महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील मुलींच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. तिच्या या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगरमधील तिचे राष्ट्रीय प्रशिक्षक मंजित सिंग दरोगा सर, सौरव दीपके सर, सर्व क्रीडाप्रेमी आणि विविध क्रीडा संघटनांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे कनिष्काचे आजोळ कणकवलीत आहे. ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांची कनिष्का नात आहे.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगमच्छिमारांना कुणावरही अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय:ना नितेश राणे
ब्रेकिंगराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या विजयादशमी उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर
ब्रेकिंग