मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

प्रतिकूल हवामानाने भातपिकाच्या उत्पादनाला फटका

चाफेड, सांडवे, साळशी, कुवळे येथे भातशेतीची पाहणी

📅 १ ऑक्टोबर, २०२६👁 ७
प्रतिकूल हवामानाने भातपिकाच्या उत्पादनाला फटका

*कोंकण एक्सप्रेस

*प्रतिकूल हवामानाने भातपिकाच्या उत्पादनाला फटका

*चाफेड, सांडवे, साळशी, कुवळे येथे भातशेतीची पाहणी

*शिरगाव : संतोष साळसकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी चाफेड, सांडवे, साळशी व कुवळे येथील भातशेतीची पाहणी करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार शिरगांव जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, शिरगांव पंचायत समिती सदस्य शीतल तावडे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा दौरा केला.

प्रतिकूल हवामानाचा भातपिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. अनेक ठिकाणी पीक अद्याप पोटरीच्या अवस्थेत असून पूर्ण वाढ झालेली नाही. काही ठिकाणी पोसवण झाली असली तरी दाणे भरण्याचे प्रमाण कमी आहे. कडक उन्हामुळे काही भागातील पीक करपल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.

तसेच सांडवे येथे मोठ्या क्षेत्रावर घेतलेल्या भुईमूग पिकालाही पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. यावेळी शेतकऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात शिरगांव जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम,शिरगांव पंचायत समिती सदस्य शीतल तावडे, कुवळेचे सरपंच सुभाष कदम, उपसरपंच सुहास राणे, सांडवेचे सरपंच भगवान परब, चाफेडचे सरपंच साहिल पांचाळ, उपसरपंच महेश राणे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, साळशीच्या सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच पांडुरंग मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पूनम मणचेकर, शिरगाव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बापूसाहेब लांबाडे, तंत्रज्ञान व्यवस्थापक निकेतन राणे, ग्रामपंचायत अधिकारी देशमुख व पवार, सहाय्यक कृषी अधिकारी अमोल इढोले व गुरुनाथ बोडेकर तसेच शेतकरी सहभागी झाले होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →