मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

साळशीत समुद्रमंथनाचा पौराणिक देखावा..घाडी बंधूंच्या कलेची परंपरा कायम

📅 २५ सप्टेंबर, २०२६👁 ५#देवगड
साळशीत समुद्रमंथनाचा पौराणिक देखावा..घाडी बंधूंच्या कलेची परंपरा कायम

कोंकण एक्सप्रेस

साळशीत समुद्रमंथनाचा पौराणिक देखावा..घाडी बंधूंच्या कलेची परंपरा कायम

शिरगाव : संतोष साळसकर

देवगड तालुक्यातील साळशी येथे अनंत घाडी कुटुंबीयांनी समुद्रमंथनातून निघालेले ‘हलाहल’ विष भगवान महादेवांनी प्राशन केल्याचा पौराणिक प्रसंग चलचित्र देखाव्यातून साकारला आहे. योगेश व अमोल घाडी बंधूंनी आठ दिवस मेहनत घेऊन साकारलेला हा देखावा गणेशोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पौराणिक आख्यायिकेनुसार, देव-दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन केले असता अमृतापूर्वी ‘हलाहल’ विष बाहेर पडले. त्याच्या दाहकतेमुळे सृष्टीच्या विनाशाचा धोका निर्माण झाला. सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले. देवी पार्वतीने ते कंठातच रोखल्याने महादेवांचा कंठ निळा पडला आणि ते ‘नीलकंठ’ म्हणून प्रसिद्ध झाले.

याच प्रसंगाची दृश्यरचना घाडी बंधूंनी देखाव्यात केली आहे. समुद्रमंथन करणारे देव-दानव, शेषनागाचा दोरखंड तसेच हलाहल विष प्राशन करणारे भगवान भोलेनाथ यांचे प्रसंग चलचित्राच्या माध्यमातून जिवंत करण्यात आले आहेत.

घाडी कुटुंबीय गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ गणेशोत्सवात धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारे विविध देखावे साकारत आहेत. यंदाचा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत भाविकांना पाहता येणार आहे.योगेश व अमोल घाडी यांचा गावातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. यापूर्वी साकारलेल्या त्यांच्या देखाव्यांना बक्षिसेही मिळाली आहेत.

सण-उत्सव, लोककला आणि संस्कृती जपण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. भाविकांना दरवर्षी काहीतरी नवीन दाखविण्याचा प्रयत्न असतो. देखावा उभारणीचा खर्च वाढला असला तरी कला कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही, असे देखावा सादरकर्ते योगेश घाडी यांनी सांगितले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →