मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्लेत आसोली-रांजणवाडीत बंधारा

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद *भाजपा ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी व ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधला बंधारा

📅 १ ऑक्टोबर, २०२६👁 ९
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्लेत आसोली-रांजणवाडीत बंधारा

*कोंकण एक्सप्रेस

*पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्लेत आसोली-रांजणवाडीत बंधारा

*मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

*भाजपा ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी व ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधला बंधारा

*वेंगुर्ले : प्रतिनिधी

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्याच्या उद्देशाने आसोली-रांजणवाडी येथील वहाळावर भाजपचे ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून बंधारा उभारण्यात आला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे स्थानिक पातळीवर राबविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी एकत्र येऊन वहाळावर बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या सहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यासह परिसरात जलसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

वहाळातील पाणी अडविल्यामुळे परिसरातील विहिरी व अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन जलसंधारणाचे काम हाती घेतल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. भविष्यातही गावातील विविध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, या.का.का. सदस्य गुरुनाथ घाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले .

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वेंगुर्ला मधील अधिक बातम्या

अधिक पहा →