मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी ..क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*

📅 ३० सप्टेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग#सिंधुदुर्ग
क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी ..क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*

*कोंकण एक्सप्रेस*

*क्रीडा ई-प्रमाणद्वारे ५ टक्के आरक्षणासाठी *

*क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा*

*सिंधुदुर्ग*

क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक क्रीडा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ (Krida e-Pramaan) प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र खेळाडूंनी या प्रणालीद्वारे ऑनलाइन नोंदणी करून क्रीडा प्रमाणपत्रासाठी विनंती करता येणार आहे.

क्रीडा ई-प्रमाण प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी https://kridaepramaan.org/register या लिंकचा वापर करता येईल. तसेच क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन मुख्य पृष्ठावरील ‘माझ्या सेवा’ या पर्यायामधून ‘५ टक्के आरक्षण’ ही सेवा निवडून नोंदणी करता येईल.

नोंदणीसाठी ‘Register here’ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक वैयक्तिक माहिती अचूकपणे भरावी. त्यानंतर नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे पडताळणी पूर्ण करावी. ई-मेलवर प्राप्त Credentials च्या आधारे लॉगिन करून, आवश्यक असल्यास पासवर्ड Reset करावा.

प्रमाणपत्रासाठी विनंती करण्यासाठी लॉगिन केल्यानंतर ‘Request Certificate’ या विभागात जाऊन संबंधित स्पर्धेविषयीची संपूर्ण व अचूक माहिती भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड करावीत.

नोंदणी करताना नाव, जन्मतारीख, ई-मेल व मोबाईल क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे. OTP पडताळणीसाठी नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांक उपलब्ध ठेवावा. प्रमाणपत्रासाठी सादर केलेली माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट, पूर्ण व अधिकृत असावीत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →