मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कै. दत्तात्रय फोपे यांना करूळ येथे शोकसभेत वाहिली श्रद्धांजली

📅 २८ सप्टेंबर, २०२६👁 १२#निटेश राणे
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कै. दत्तात्रय फोपे यांना  करूळ येथे शोकसभेत वाहिली श्रद्धांजली

कोंकण एक्सप्रेस

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कै. दत्तात्रय फोपे यांना करूळ येथे शोकसभेत वाहिली श्रद्धांजली

कणकवली : संजना हळदिवे

करूळचे माजी सरपंच दत्तात्रय फोपे यांच्या निधनानंतर करूळ हायस्कूल येथे आयोजित शोकसभेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असतानाही केवळ दत्तात्रय फोपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आवर्जून येथे आलो असल्याचे ना. नितेश राणे यांनी सांगितले.

ना. नितेश राणे म्हणाले, दत्तात्रय फोपे यांचे करूळ गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान होते. गावाचा विकास शेवटच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. गावातील विकासकामांसंदर्भात ते सातत्याने आपल्याशी संपर्क साधत असत. विकासकामांची यादी पाठवून त्याचा पाठपुरावाही ते करत असत. त्यामुळे गावाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देताना ना. राणे म्हणाले की, २०१४ मध्ये आपण पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला उभे राहिलो होतो. त्यावेळी दत्तात्रय फोपे यांनी आपल्या गावातील कार्यकर्त्यांची बैठक आपल्या घरी घेतली होती. तत्कालीन राणे साहेबांबद्दल असलेला आदर आणि आपुलकी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपली हक्काची सर्व मते नितेश राणे यांना दिली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी कार्यकर्त्यांकडे केला होता.

पुढे ते म्हणाले, समाजामध्ये काही माणसे आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण करून जातात. पुढील अनेक पिढ्यांपर्यंत त्यांच्या नावाचा उल्लेख होत राहतो. दत्तात्रय फोपे हे त्यापैकीच एक होते. करूळ गावाच्या जडणघडणीमध्ये त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. आज आपल्या घरातील एक सदस्य आपल्यातून गेला आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. कै. दत्तात्रय फोपे यांच्या निधनाने गावाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपल्या वतीने, राणे कुटुंबीयांच्या वतीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दत्तात्रय फोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी व्यासपीठावर करुळ गावचे सरपंच समृद्धी नर, माजी सरपंच बबन कर्णिक, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, पत्रकार गणेश जेठे, रामेश्वर सोसायटीचे चेअरमन अण्णा तेंडुलकर, नाथ पै ज्ञानप्रबोधिनीचे मुख्याध्यापक श्री. नारकर, समाजवेध संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर तांबे, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →