कणकवली नगरपंचायतीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६
📅 २५ सप्टेंबर, २०२६👁 ३२

कोंकण एक्स्प्रेस
कणकवली नगरपंचायतीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायतीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६ अंतर्गत शहरातील विविध गणेश सजावटींचे सर्वेक्षण करण्यात आले. पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना यांची पाहणी यावेळी करण्यात आली.
या सर्वेक्षणावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, पाणीपुरवठा अभियंता सोनाली खैरे, स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, सहायक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, शहर समन्वयक जयश्री ठाकरे तसेच रवींद्र महाडेश्वर उपस्थित होते.
शेअर करा · Share
जाहिरात



