मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

📅 २४ सप्टेंबर, २०२६👁 ११ब्रेकिंग
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

कोंकण एक्सप्रेस

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

सिंधुदुर्ग : प्रतिनिधि

दिनांक 31/7/2020 रोजी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे कासार्डे येथील स्मिता शिवाजी भोसले हिला श्वसनाच्या उपचारासाठी तिच्या मुलानी दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू होते परंतु तिची तब्बेत ढासळत होती. दिनांक 15/7/2020 रोजी रात्री तिची तब्येत खूप बिघडली होती. त्यावेळी डॉ.नागेश पवार आणि डॉ.सौरभ सुरेश लिहितकर जिल्हा रुग्णालयात कार्यरत होते. पेशंट बरी होत नसेल तर उपचारासाठी आम्ही बाहेर नेतो असे स्मिता हिच्या मुलानी सांगून एकेरी भाषा वापरली, डॉ. पवार उपचार करण्यासाठी लवकर का येत नाहीत असे म्हणुन स्मिता भोसले हिच्या दत्तराज, राजेश, राकेश या तिन मुलानी आणि दीर विश्वनाथ भोसले यानी डॉ. लिहितकर यांचा हात पकडला. राकेशने लोखंडी स्टूल उचलून शिवीगाळ करत मारायला अंगावर आला म्हणुन डॉक्टरांनी पोलीस स्टेशन येथे फोन केला त्याचवेळी वॉर्डबॉयने येउन सांगितले की पेशंट स्मिता भोसले यांची तब्येत जास्त बिघडली आहे, म्हणून डॉक्टर ICU कडे जात असताना सर्व आरोपींनी मिळून त्यांना ICU च्या दरवाज्यात अडवले. राजेशने ठोसा मारला आणि शर्ट पकडला- दत्तराजने डॉ. लिहितकरांच्या उजव्या हाताचे बोट पकडून दुमडले, सर्वांनी मिळून ढकलाढकली करून ICU च्या दरवाजाची काच लोखंडी स्टूलने फोडून नुकसान केले, त्यावेळी सुरक्षा रक्षकाने बाजूला केले अश्या आशयाची तक्रार डॉ. लिहीतकर यांनी ओरोस पोलिस स्टेशन येथे दिली असता आरोपींवर भा.दं.वि. कलम 353,332, 504, 506, 34 आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था संरक्षण अधिनियम 2010 चे कलम 4 डॉक्टर / मेडिकल स्टाफवर हल्ला आणि हॉस्पिटलच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच पहाटे स्मिता भोसले हिचे रुग्णालयात निधन झाले होते, रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आईचे निधन झाले डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी तक्रार आरोपींनी ओरोस पोलिस स्टेशन येथे दिली होती.

सदर खटल्याची सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता खटल्याच्या कामी डॉ. लिहीतकर, डॉ. पवार, पंच, तपासिक अंमलदार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. घटनास्थळी सीसीटीव्ही असतानाही त्याचे फुटेज तपासकामात सामील न करणे , फिर्याद उशिरा देणे, टिपणे उशिरा नोंदवणे, आरोपीनी रुग्णालयावर तक्रार दाखल केल्याने रुग्णालयाची बदनामी होऊ नये म्हणुन आरोपी विरुद्ध डॉक्टरांनी फिर्याद दाखल केली असा बचाव आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला असता आरोपींची पुराव्या अभावी सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. विलास परब यांनी काम पाहिले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →