मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठार

कासार्डे येथे लांजा-राजापूर विधानसभा चिंतन बैठक उत्साहात संपन्न प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

📅 २० सप्टेंबर, २०२६👁 २४ब्रेकिंग
संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठार

कोंकण एक्सप्रेस

संघटन बळकटीसाठी गावागावात सक्रिय व्हा; जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठार

कासार्डे येथे लांजा-राजापूर विधानसभा चिंतन बैठक उत्साहात संपन्न

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

कासार्डे : प्रतिनिधी

लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आज कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयात आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनतेशी थेट संपर्क साधावा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व सेवा उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

तळागाळातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघटनेची ताकद अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने सक्रियपणे योगदान देणे आवश्यक असल्याचेही आमदार जठार यांनी यावेळी सांगितले. आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, विविध उपक्रम आणि जनसंपर्क याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस अभिजित गुरव, राजापूर मंडल अध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे, मोहन घुमे, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचणकर, चंद्रकांत मांडवकर, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हणकर, अमित केतकर, संजय यादव, सुरेश गुरव, शैलेश खामकर, प्रथमेश बेंडल, अमोल कानडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संघटनात्मक कामाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेअर करा · Share

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →