मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा!

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा! ११ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ८ मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

📅 १३ सप्टेंबर, २०२६👁 १३
कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा!

कोंकण एक्सप्रेस

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा दबदबा!

११ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ८ मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

फोंडाघाट : संजना हलदिवे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय, कासार्डे येथे कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत वर्चस्व गाजवले.

            १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी

1) पार्थ सांडिम (प्रथम)

2) वरुण देसाई (द्वितीय)

            १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी

1) कु.ऋतुजा चव्हाण (प्रथम)

          १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थी

1) दुर्वांक नातू (प्रथम) 

2) श्रीहरी गिरीबुवा (प्रथम)

3) जय देसाई  (तृतीय)

                १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थी

1) तेजस पारकर (प्रथम) 

2) केदार पुजारी (प्रथम)

3) आकाश गोंधळी (प्रथम)

4) प्रथमेश चिखले  (प्रथम)

5) सिद्धेश सांडिम  (तृतीय)

            वरील  प्रथम क्रमांक मिळविलेल्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी  विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. अ. वि. पोफळे यांचे मार्गदर्शन लाभले.

              या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री. म. ज. सावंत, सेक्रेटरी मा. श्री. चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. वि. रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार, संचालक, मुख्याध्यापक श्री. प्र. कृ. पारकर, पर्यवेक्षक श्री. वि. पां. राठोड, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →