मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक

📅 २५ सप्टेंबर, २०२६👁 १६ब्रेकिंग
शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक

*कोंकण एक्स्प्रेस

  • शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक
    कणकवली : प्रतिनिधी

  • शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगून फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक.

कणकवली पोलीस ठाणे गु.र.नं. 73/2024 भा.दं.वि. कलम 406, 420, 467, 468, 471, 34 सह MPID 1999 चे कलम 3, 4(1) हा गुन्हा दिनांक 27.02.2024 रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी, साक्षीदार, ठेवीदार यांची एकूण 1,48,00,000/- रुपये (एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये) ची फसवणूक करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी क्र.1)विवेक विजय पार्टे व आरोपी क्र.2) वेदिका विवेक पार्टे हे गुन्हा घडल्यापासून नजरेआड होते. दोन्ही आरोपींचा मागील दोन वर्षांत शोध घेवूनही सदरचे आरोपी मिळून येत नव्हते. तसेच त्यांचे वास्तव्याबाबतही काही माहीती मिळून येत नव्हती. सदर पाहीजे आरोपी अभिलेखावरील आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत वरिष्ठांचे आदेश झाल्याने सपोनि/ सनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली नियुक्त पथकाने दोन्ही आरोपींचे पार्श्वभुमीबाबत माहिती घेवून तांत्रिक विश्‍लेषणाव्दारे पुणे, नसरापूर येथे जावून सापळा लावून् शिताफीने आरोपी विवेक विजय पार्टे, वय 53 वर्ष, रा. नसरापूर, बालाजी कलेक्शन, ता.भोर, जिल्हा-पूणे याला दिनांक 24.09.2026 रोजी ताब्यात घेतले. त्याला गुन्ह्याचे पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग येथे हजर केलेले आहे.

त्याचे विरुध्द सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 48/2024, भा.दं.वि. कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्येही तो पाहीजे आरोपी आहे.

पोलिसांना गुंगारा देत मागील दोन वर्ष मिळून येत नसलेला आरोपीस अटक करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग ने चांगली कामगिरी केलेली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, मोहन दहिकर, मा. अपर पोलीस अधीक्षक, नयोमी साटम यांचे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक, प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक/ सनिल पाटील, सहा.पोउनि/ राजेंद्र जामसंडेकर, पोहेकॉ/722 ज्ञानेश्वर तवटे, पोहेकॉ/731 किरण देसाई, मपोहेकॉ/306 रुपाली खानोलकर व पोहेकॉ/1019 अविनाश ओटवणेकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांनी केलेली आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →